buldhana : शहरात लावण्यात आलेले बचत गट प्रदर्शनीचे बॅनर फाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिशा बुलडाणा buldhana जिल्हा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून तसेच जयश्री शेळके यांच्या पुढाकारातून बुलडाणा buldhana शहरात प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते, यंदाही या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी बुलडाणा buldhana शहरात ठीक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. आज एक बॅनर फाडण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. यावर जयश्री शेळके jayshree shelke यांनी संताप जनक प्रतिक्रिया दिली आहे. ही गुंडशाही आहे, झुंडशाही आहे.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे…
दिशा फेडरेशनच्या माध्यमातून महिलांसाठी मोठे काम उभे राहत आहे. काही विकृत मानसिकतेच्या लोकांना हे पाहवत नाही. त्यांच्या पोटात दुखते, स्वतः तर ते कोणतेही काम करत नाही उलट कामात खोडा आणण्याचा हा विकृत प्रयास आहे. हजारो माता भगिनींचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, त्यामुळे कार्यक्रम होईलच असेही जयश्री शेळके jayshree shelke यांनी सांगितले.