badlapur akshay shinde encounter : पोलिसांनी अक्षय शिंदेच्या akshay shinde थेट डोक्यातच गोळी का मारली, अक्षयने जेव्हा पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतले तेव्हा त्याला ते अनलॉक कसे करता आहे, त्याला बंदूक चालवता येत होती का, अशा असंख्य प्रश्नांच्या फैरी झाडत उच्च न्यायालयाने बदलापूर badlapur अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या एन्काउंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत झाला प्रकार एन्काउंटर असूच शकत नाही, असे परखड मत नोंदविले.
अक्षयचे वडील अण्णा शिंदे anna shinde यांनी मुलाची बनावट चकमकीत हत्या करण्यात आल्याचा दावा करत या प्रकारणाचा तपास विशेष पथकामार्फत एसआयटी) तपास व्हावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर बुधवारी न्या, रेवती मोहिते-ढेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली सुनावणीवेळी न्यायालयाने क्राईम ग्रंच व ठाणे पोलिसांच्या तपासातील त्रुटी दाखविल्या, विशेषता ‘फॉरेन्सिक’ पुराव्यांबाधत प्रश्न उपस्थित केले. हितेन वेणेगावकर यांनी सरकारची बाजू मांडली. आरोपीवर गोळी दूरवरून झाडली की पॉइंट ब्लैक रेंजने, अशीही विचारणा न्यायालयाने केली. आरोपीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे तोडी आदेशही न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
उत्तरावर न्यायालयाचे समाधान नाही
पोलिसांनी आरोपीच्या थेट डोक्यातच गोळी का मारली? सरकारी वकील: पोलिस सहायक निरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. न्या. चव्हाण: या स्थितीचा समान कसा करायचा, हे माहीत नाही, असे तो अधिकारी बोलू शकत नाही. आधी गोळी कुठे मारायची, याबाबत त्यांना माहीत असेल, ज्या क्षणी त्याने बंदुकीचा दिगर ओडला त्यावेळी गाडीतील अना पोलिस त्याला सहज काबू करू शकले असते. आरोपीची शरीरयष्टी धिप्पाड नव्हती, त्याला एकाउंटर म्हणता येणार नाही. सत्य समोर आणा म्हणजे लोक स्वतःच निष्कर्ष काढणार नाहीत.
न्यायालयाने विचारलेली प्रश्ने
अक्षय शिंदेंच्या डोक्यातच गोळी का मारली ?
पोलिस डोक्यात गोळी मारतात की पायावर?
आरोपीवर नियंत्रण का मिळविले नाही, गोळी का मारली ?
गोळ्या मारल्या, एक लागली, इतर दोन गोळ्या कुठे?
एका आरोपीला ३ पोलिस कंट्रोल करू शकत नव्हते का?
पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती?