sakharkherda : पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदी shindi येथील एका महिलेवर दारूविक्री प्रकरणी ४५ गुन्हे दाखल झाले असता वारंवार सूचना देऊनही अवैध दारू विक्री सुरुच ठेवली. त्या प्रकरणी साखरखेर्डा sakharkherda पोलिसांनी तडीपार करण्यात का येऊ नये ? असा प्रस्ताव सादर केला होता. आज २३ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तो आदेश पारित केला.
शिंदी गावात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध दारूविक्री करीत असलेली महिला श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे वय ५३ वर्ष यांच्यावर अवैध दारू विक्री प्रकरणी वारंवार दारू प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे दाखल केले होते. तब्बल ४५ गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतरही अवैध दारू विक्री करणे, दारुचा साठा करून ठेवणे प्रकरणी साखरखेर्डा sakharkherda पोलिसांच्या अभिलेखावर ४५ गुन्हे दाखल आहेत. उपरोक्त प्रकरणी श्रीमती ‘लक्ष्मीबाई मारोती वाघमारे’ lakshmibai maroti waghamare या महिलेला तडीपार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे पाठविला होता.
त्यांचे मार्गदर्शन घेऊन उपरोक्त प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांना सादर केला. वरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) अन्वये सहा महिने जिल्हा बंदीचे आदेश पारित केला आहे आज २३ सप्टेंबर रोजी साखरखेर्डा sakharkherda पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, बीट जमादार नितीन राजेजाधव व पोलिसांनी श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे lakshmibai maroti waghamare हिला तडीपार आदेश बजावला आहे. जवळच्या वाशिम जिल्हा वगळता अकोला जिल्ह्यात सदर महिलेचे वास्तव्य राहणार आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक अशोक लांडे (जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग), यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, पोहेकॉ. नितीन राजे जाधव, राजेश गीते, संजय भुजबळ यांनी केली आहे.