Washim : जय भवानी गणेश मंडळाची मिरवणूक शांततेत पार !.मिरवणुकीत सामाजिक ऐक्याचा लाख प्रशंसा पात्र संदेश ,जिल्हाभरातून कौतुक !.

 

 

वाशीम प्रतिनिधी /( नारायणराव आरु पाटील) 

 

वाशिम (washim) जिल्ह्यातील केनवड येथील एकमेव पोलीस प्रशासनाची परवानगी प्राप्त ,सर्वलौकिक व गावातील सर्वसमाज घटकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल मंदिर स्थित ५४ वर्षांची परंपरा असलेल्या जय भवानी गणेश मंडळाची मिरवणुक काल हिंदू_मुस्लिम_बौद्ध असा सामाजिक एकोप्याचा संदेश देत जिल्हाभरातून कौतुकाची थाप पाठीवर घेत शांततेत पार पडली !

 

स्व.देवराव सदूजी गोळे ह्यांनी १९७१ साली जय भवानी गणेश मंडळाची स्थापना केली , पुढे मंडळाची जबाबदारी स्व.सुरेश लक्ष्मण गोळे ह्यांनी घेतली व तेव्हा पासून आज पर्यंत मंडळाच्या तरुण मंडळीच्या सहभागाने ही परंपरा कायम आहे.भवानी मंडळाची मागील काही काळातील मिरवणूका तर पोलीस प्रशासनाची परवानगी असताना देखील सामाजिक भान ठेवून अगदी साध्या पद्धतीने बाप्पांचं विसर्जन केल्याचे अनेक उदाहरणं केनवड गावाने बघितले आहेत !

 

स्व.सुरेश गोळे यांच्या काळात मंडळा समोर VCR च्या माध्यमातून गावातील माता_भगिनी , पुरुषांच्या प्रचंड गर्दीने VCR द्वारे रामायण , महाभारत अश्या लोकप्रिय मालिकांचा आनंद मनसोक्त लुटला !काल दि .१८ सप्टे २०२४ ला संध्याकाळी जय भवानी गणेश मंडळाच्या मिरवणुकीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली !

 

 

प्रथमता मिरवणुक ही भिम नगरातून जात असतात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर मिरवणुक पोचताच मंडळाच्या वतीने प्रचंड जल्लोषात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करण्यात आला , नंतर मंडळाच्या सर्व सदस्यांच् बौद्ध बांधवांनी सुद्धा उत्स्फूर्त पणे मंडळाच स्वागत करून मंडळा साठी चहा_पाण्याचा व्यवस्था केली , बौद्ध बांधवांच्या ह्या सहकार्याने बाप्पांच्या मिरवणुकीला अधिकच रंगत चढली !

 

 

पुढे मिरवणुक गणपती मंदिरा समोरून कोयाळी रस्त्याने हाय_वे कडे जात असताना केनवड येथील मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांनी जय भवानी गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांसाठी चहा_पाण्यासोबत पोह्यांची व्यवस्था केली व एक सामाजिक एकोप्याचा संदेश दिला !जय भवानी गणेश मंडळाची एक बाब खास करून बघायला मिळाली ती म्हणजे समाजातील सवर्ण हिंदू समवेत इतर सर्वच जाती धर्माच्या वतीने जय भवानी गणेश मंडळाच्या शेकडो सदस्यांच्या उपस्थीतीत बाप्पाला मोठ्या श्रध्देने अखेरचा निरोप देण्यात आला , ह्या सामाजिक एक्याचं गावातच नव्हे तर जिल्हाभरातून कौतुक होत आहे !