मतमोजणी करतांना वायकरांच्या नातेवाईकांनी वापरला evm अनलॉक करणारा फोन. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्यामध्ये तपासात पंडीलकर evm जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.वनराई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंडीलकरकडे सापडलेला फोन हा दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाइल फोन ४ जून रोजी नेस्को Nesco सेंटरमध्ये वापरण्यात आलेले evm मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला होता.
पंडीलकरचा मोबाइल ४ जून रोजी सीज केला गेला. तसेच त्यातील डेटा शोधण्यासाठी तो मोबाइल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) पाठवला असून, त्या मोबाइल फोनवरील बोटांचे ठसेही घेतले आहेत.
याच्या अहवालानंतर पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होईल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाकडून काही एंट्री पॉईंट, स्ट्राँग रूम अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कोनाकोपऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे.