नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
दिनांक:-३१/०८/२४ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर (mangarulpir) आगार येथे संयुक्त कृती समितीच्या वतीने मा.मुख्यमंत्री महोदय यांनी आपला शब्द न पाळल्यामुळे राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत काळ्या फिती लावुन निर्दर्शने देण्यात आली यावेळी संयुक्त कृती समितीचे विभागीय पदाधिकारी श्री.अनिलजी बंगाळे,श्री.करूनजी शिरसाठ,श्री.उदयजी गंगाखेडकर व श्री.रूपमजी वाघमारे यांनी संयुक्त कृती समितीची वाटचाल व दिनांक:-०३/०९/२४ पासुन सुरू होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलन संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी मंगरुळपिर आगारातील, विभागातल्या, कार्यालयातल्या, कार्यशाळेतल्या प्रत्येक युनिट मधील कामगारांचा या उपक्रमात १००% सहभाग असला पाहिजे व सर्व बंधू भगिनींना काळ्याफिती वाटप करून ते लावण्याचे आवाहन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्रत्येक आगारात आजपासून शंभर टक्के काम हे कामगार काळ्या फिती लावून करतील असे नियोजन सर्व एस टी कामगारांनी केले. संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य कर्मचारी बांधव उपस्थित होते.