शाळेतील मुलीवर झालेल्या अत्याचारा मुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर व अकोल्यासह बुलढाण्यात सुद्धा अनेक मुलीवर अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रतेक खासगी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले होते. परंतु जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही व अनेक शाळेतील मुख्याध्यापक आदेशांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत नाहीत. अशा खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार बिले रोखण्याचे आदेश दिले आहे.
शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत, तसे न केल्यास त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन देयके स्वीकारू नये अशी कडक सूचना शिक्षणाधिकारी यांनी वेतन पथक अधीक्षकांना देण्यात आली आहे. याशिवायच शाळेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करणे, तसेच शाळेतील मुलींसाठी तक्रार पेटी बसविणे व शालेय विद्यार्थी सुरक्षा समिती गठित करणे असे शासनाचे आदेश आहेत. व विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सुचित करण्यात आले आहे.
यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे हे अनिवार्य आहे तरीसुद्धा बरेच खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांनी यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचे उघड झाले आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन केल्याशिवाय व शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय कुठल्याही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन देयके स्वीकारू नये असा निर्देश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल अवकाळ यांनी दिले आहेत.