वर्दडी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात करणार हजर.

 

 

रामदास कहाळे/ सिंदखेडराजा प्रतिनिधी

 

सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी जिल्हा परिषद  अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडी मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे आज पुन्हा आरोपी शिक्षकाला मेहकर येथील सेशन कोर्टात हजर केले जाईल. तेव्हा पुन्हा पोलिस कोठडी मिळणार का..? की  न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी होणार, हे आज स्पष्ट होईल.

 

 

 

२३ ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचाराचा हा खळबळजनक प्रकार सिनखेडराजा तालुक्यातील वरदडी जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला होता. ही घटना अतिशय गंभीर असल्याने पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. किनगाव राजा पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २४ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही मुदत आज संपत आहे. तर आरोपीला आज मेहकर येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.