बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात खेरडा गावाजवळ अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. जलंब येथून शेगावकडे जात असताना अचानक रोही वाहनासमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० ते २५ फूट खाली पलटी झाले. अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण होते; मात्र सुदैवाने वाहनातील चौघांनाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अपघाताच्या वेळी वाहनात माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, एक शिक्षक आणि वाहनचालक असे चौघेजण होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आल्यानंतर नातेवाईक, सहकारी आणि समर्थकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जलंब येथून शेगावकडे जात असताना अचानक रोही वाहनासमोर आला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेले वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० ते २५ फूट खाली पलटी झाले. अपघातानंतर वाहनातील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, कालच श्रीकांत देशपांडे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेतली होती. आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे बुलढाणा विभागात दौरे सुरू आहेत. याच दौऱ्यादरम्यान हा थरारक अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच त्या मार्गाने जाणारे मोताळा तालुक्यातील जागरूक नागरिक पिंटू पाटील (शिंब्रे), रा. परडा आणि बळीराम वनारे, रा. टाकळी शेगाव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवत माजी आमदार श्रीकांत देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे अपघातग्रस्तांना तातडीचा आधार मिळाला.
या अपघातात मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. अपघाताची नेमकी वेळ आणि वाहनाचे नुकसान याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
📲 ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा
बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
तुमचे मत: अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणाऱ्या नागरिकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून दिसून येते. अशा मदतकार्याच्या घटना तुमच्या परिसरात घडल्या असतील, तर आम्हाला कळवा.
📰 संबंधित बातम्या
बातमी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा.









