चिखली येथील युवा पत्रकार आणि दैनिक ‘आम्ही चिखलीकर’चे मुख्य संपादक छोटू सुधाकर कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याबद्दल २९ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार छोटू कांबळे यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडणे आणि स्थानिक घडामोडींना निर्भीडपणे प्रसिद्धी देण्याच्या कार्याची दखल घेत छोटू कांबळे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पत्रकार छोटू कांबळे यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा सन्मान झाल्याने पुढील वाटचालीस नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते डॉ. प्रतापसिंह राजपूत, नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, भास्कर राऊत, चिखली तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख विलास घोलप, महिला जिल्हाप्रमुख मायाताई मस्के, अनुजाताई सावळे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. भागवत राजपूत, डॉ. पंढरी इंगळे, कपिल खेडेकर, युवा सेना विधानसभा संपर्कप्रमुख अनमोल ढोरे, चिखली युवा सेना तालुकाप्रमुख गोपीनाथ लहाने, युवा सेना शहरप्रमुख राजेश पवार, विशाल इंगळे, गणेश भवर, पवन चिंचोले, विष्णु आव्हाळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय आयुषमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी युवा पत्रकार छोटू सुधाकर कांबळे यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक केले. निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेसाठी मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांनी कांबळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ना. जाधव यांच्या या प्रोत्साहनामुळे पत्रकार छोटू कांबळे यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
📲 चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी कट्टान्यूज WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
संबंधित बातम्या
- लोणारमध्ये दुचाकी चोरीचा छडा; २० वर्षीय आरोपीला अटक, पाच दुचाकींसह १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
- भूमिहीनांना मोफत शेतजमीन! अनुसूचित जाती, नवबौद्ध कुटुंबांसाठी मोठी संधी; ५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव द्या
- जालना SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री खळबळ; बुलढाणा जिल्ह्यातील गुंजच्या 25 वर्षीय जवानाने स्वतःवर झाडली गोळी










