नारायणराव आरू पाटील वाशिम/प्रतिनिधी
महाराष्ट्र ऍग्रो बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ ऑगस्ट रोजी रिसोड येथे सिताफळ शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेमध्ये अनेक तज्ज्ञ श्री.दिनेश डागा उपव्यवस्थापक म.रा.कृ.प.म. तथा प्रकल्प संचालक (PIU) मॅग्नेट,विभागीय कार्यालय अमरावती, श्री आरिफ शाह जिल्हा कृषी अधीक्षक,श्रीमती अनिता महाबळे,प्रकल्प संचालक (आत्मा) वाशिम,श्री. संजय चातरमल उपविभागीय अधिकारी वाशिम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तर तज्ञ म्हणून श्री.नवनाथ मल्हारी कसपटे ता .बार्शी ता.सोलापूर,श्री. शाम गट्टानी अध्यक्ष सिताफळ महासंघ,श्री.राहुल घोरपडे कृषी तज्ञ पुणे,श्री.विनय बोथरा सचीव सिताफळ महासंघ,श्रीमती मयुरी मिसाळ (GUSI) अधिकारी मॅग्नेट अमरावती यांचे मार्गदर्शन लाभणार असून सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रिसोड कृषी अधिकारी मगनदास तावरे यांनी केले आहे. कार्यक्रमांमध्ये सिताफळ फळबाग विषयी लागवड, तंत्रज्ञान, किडरोग नियंत्रण, काढणी पश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग, सिताफळ पीक मार्केटिंग तंत्रज्ञान याविषयी महाराष्ट्रातील विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत ही कार्यशाळा २१ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० मी.कार्यक्रम सुरू होईल.
रिसोड येथील विश्वा लाॅन, मालेगाव रोड रिसोड येथे, तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी,विद्यार्थ्यांनी, महीला बचतगट,आणि शेतीची आवड असणाऱ्या सर्वांनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन मार्गदर्शन घेऊन आपल्या आयुष्यातील कुटुंबासाठी शेतातून उत्पादन वाढवण्यासाठी, आर्थिक उत्पादन व उत्पन्न कसे वाढेल या बाबीकडे लक्ष द्यावे यासाठी ही कार्यशाळा रिसोड तालुका कृषी विभाग,आणखी आत्मा यांचेकडून आयोजित करण्यात आले आहे.