नारायणराव आरु/प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील कोयाळी भिसडे येथील महिला व पुरुषांनी व लहान मुलांनी कावड यात्रेत भाग घेऊन गावातील सर्व भक्तगण येथील पैनगंगा महादेव मंदिर व मुरडेश्वर महादेव मंदिर येथे आपल्या कावडीसह येण्यासाठी सहभागी झाले. या कावड यात्रेत सर्व भक्तांनी पायदळ चालत प्रवास केला.
श्रावण मासा मध्ये आवड मंडळाच्या माध्यमातून शंभू महादेवाचे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्व भक्त जण आले यामध्ये जवळपास ७० महिला, १५ पुरुष, १५ लहान मुले असा सहभाग या कावड यात्रेमध्ये पायदळ वारीमध्ये नोंदवला यासाठी गजानन विष्णू भिसडे, शामराव कुंडलिक भिसडे, उमेश अग्रवाल, अशोक भगवान भिसडे, बबलू अग्रवाल, मंगेश दत्ता भिसडे , पंढरी भिसे, धोंडजी कुंडलिक भिसडे, महादेव दौलत भिसडे यांनी पुढाकार घेऊन यांच्यासह अनेक महिला, पुरुष व लहान मुले सहभागी झाले.