हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

करवंड महोत्सवासाठी मातृतिर्थ सिंदखेडराजातून निघालेल्या जिजाऊ ज्योतीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत

On: April 18, 2026 9:28 AM
Follow Us:
सिंदखेडराजातून निघालेल्या जिजाऊ ज्योतीचे करवंड महोत्सवात भव्य स्वागत
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा| १८ एप्रिल २०२६

करवंड महोत्सव यंदा ऐतिहासिक ठरला असून मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून प्रज्वलित करण्यात आलेली जिजाऊ ज्योत ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला ३७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा भव्य सोहळा पार पडला.

या महोत्सवाच्या माध्यमातून गतवैभवाला उजाळा देण्यासोबत बावन्न बुरुजांचे संवर्धन, ऐतिहासिक मंदिर, किल्ले आणि गढ्यांच्या जतनासाठी शासनाकडून भरीव निधी देण्यात यावा, अशी मागणी महोत्सवाच्या अध्यक्षा आमदार श्वेता ताई महाले यांनी केली. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांनी विविध प्रकल्पांसाठी निधीची मागणी केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवेंद्रराजे भोसले यांनी आश्वासन दिले की, मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली करवंड महोत्सव आणि गावाच्या ऐतिहासिक वास्तूंना पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

करवंड महोत्सवाच्या यशासाठी शासन, प्रशासन, स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रवास अल्पावधीत पूर्ण होणारा नसून यासाठी नियोजन, प्रशासकीय मंजुरी आणि स्थानिक सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळावरून मशाल ज्योत प्रज्वलित करून ती करवंड येथे आणण्यात आली. या प्रवासादरम्यान सिंदखेडराजा, किनगावराजा, राहेरी, दुसरबिड, शेंदुर्जन, साखरखेर्डा, लव्हाळा, अमडापूर, उंद्री या गावांमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.

या सोहळ्यात वनश्री जनाबापू मेहेत्रे, पत्रकार झोरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर गव्हाड, अण्णासाहेब आरमाळ, डॉ. सुभाष खांदवे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेशराव राजे जाधव यांनी सपत्नीक स्वागत करून परंपरा जपली.

प्रा. दिलीप नाईकवाड, विजय देशमुख, डी.एन. पांचाळ, संतोष गाडेकर, कृष्णा देशमुख यांनी ही ज्योत आणून ती महोत्सवाचे अध्यक्ष अरविंद देशमुख आणि संकल्पक सुनील जवंजाळ पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

यानंतर महाराणी गुणवंताबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ही ज्योत नेण्यात आली. राजे विजयसिंह जाधव यांनी मातृतिर्थातून आणलेला साडी-चोळीचा आहेर अर्पण करून परंपरेला उजाळा दिला.

“यंदा पहिल्यांदाच सिंदखेडराजातून जिजाऊ मशाल ज्योत आणण्यात आली असून भविष्यात या परंपरेची व्याप्ती आणखी वाढेल,” असे आयोजक प्रा. दिलीप नाईकवाड यांनी सांगितले.


📢 Call To Action

अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.


🔗 Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment