बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महिलेचं टोकाचं पाउल ; का संपवलं जीवन ? बुलढाणा जिल्हा परिषदेच्या jilha parished ‘वित्त विभागात’ कार्यरत असलेल्या एका तरुण महिला कर्मचारीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. मृतक महिला कर्मचारीचे नाव सोनल मनीष परदेसी, वय ३५ वर्षे असून तिचे माहेर साखरखेर्डा sakharkherda येथील आहे.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सर्क्युलर रोडवरील circular road जिल्हा परिषदेच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेल्या सोनल परदेसी sonal pardeshi यांचे सासू सासरे घरी असतांना त्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावला. त्यांचा मृतदेह पोस्ट मार्टम साठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.