रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते, धाड-चांडोळ रोड वरील बाजार व शिवाजी शाळा जवळील रस्ते देतायत अपघातास निमंत्रण.

 

सलमान नसीम अत्तार/ प्रतिनिधी 

रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते, धाड-चांडोळ रोड वरील बाजार व शिवाजी शाळा shivaji school जवळील रस्ते देतायत अपघातास निमंत्रण .धाड – चांडोळ मेन रस्तावर चार ते पाच ठिकाणी मोठे खड्डे पडले असून विद्यार्थ्यी, नागरिक,वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.बांधकाम विभागाने ह्या चार ते पाच ठिकाणी पडलेल्या गड्यांची तात्पुरती डागडूजी करावी अशी मागणी वाहनधारकासह नागरिक करीत आहे. धाड ते चांडोळ dhad chandol रस्त्याचे गेल्या वर्षी चिखली फाटा ते चांडोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा पर्यंत डांबरीकरण झाले आहे.

 

 

 

परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र ते देशी दारुच्या दुकाना पर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यातून बाजारा लगतचा रस्ता खालीवर झाल्याने व शिवाजी शाळा shivaji school दारूच्या दुकाना पर्यंत रस्त्याला दोन्ही बाजुने नाल्या नसल्याने पाऊसाळयात सरळ पाणी रस्त्यावर तुंबुन तलावाचे स्वरुप तयार होते.चांडोळ च्या शाळा हयाच रस्तावर असल्याने हयाच ठिकाणावरून विद्यार्थी,शिक्षकांना तसेच वाहनधारकासह नागरिकांना वापर करावे लागते. .दुसर लहान मोठे खड्डे शिवाजी शाळेजवळ असुन त्या ठिकाणी अशीच अवस्था निर्माण झाली आहे .या ठिकाणावरून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.

 

 

 

 

नविन वाहनधारकांना गडयात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक गडयात पडल्याच्या घटना घडल्या आहेत.तरी बांधकाम विभागाने बाजारा लगत, हनुमान मंदिराच्या बाजुला तुंबलेल्या पाण्याची व शाळेजवळील खड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. चौकट धाड-चांडोळरस्तावर शिवाजी शाळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर dr. babasaheb ambedkar यांच्या पुतळया पर्यंत दोन्ही बाजुला नाली नसल्याने वाहणारे सांडपाणी रस्तावर तुंबते गडयात साचलेले घाणपाणी विदयार्थी नागरीकांच्या अंगावर उडते अनेक विदयार्थींनचे कपडे खराब झाल्यामुळे घरी परतांना आढळतात.