पर्यावरण पूरक माती पासून बैल निर्मिती व हस्त निर्मिती बनवणे.

 

नारायणराव आरु पाटिल/प्रतिनिधी

 

रिठद येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत विषयावर पर्यावरण पूरक माती पासून बैल कसे बनवतात व हस्त निर्मित राखी बनवून त्यांचे प्रदर्शन भरवले या निमित्ताने मार्गदर्शन प्राध्यापक एस. आर. घुगे म्हणाले की आपण पर्यावरण विरोधी कोणत्याही गोष्टी न करता पर्यावरणावर चा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक वस्तू बनवाव्यात, ज्यामुळे आपल्या पृथ्वीतलावरील आपण केलेल्या कृतीमुळे कुणाला इजा होणार नाही किंवा पृथ्वीवरचे वातावरण बिघडणार नाही.

 

 

 

 

याबाबतची काळजी घेणे गरजेचे आहे व स्वतःच्या हाताने राख्या बनवत असतांना आपण प्रयत्न जसे ह्या राख्या सुद्धा पर्यावरण पूरक राहण्यासाठी बनवतांना योग्य ती काळजी घ्यावी. व भविष्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी हा व्यवसाय सुद्धा करू शकतो. जीवनात या बाबी नक्कीच कमी पडतात व दुसऱ्याच्या जीवावर विसंबून राहण्याची वेळ येणार नाही. असे आवाहन यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. उपस्थित पर्यवेक्षक आर.बी.भिसडे, प्राध्यापक व्हि.सी. वानखेडे, वर्गशिक्षक डी.डी.मोरे, सरनाईक सर, महाजन सर, खंदारे मॅडम, देशमुख मॅडम, राजुरकर सर इत्यादी शिक्षक वृंद वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.